शेतकर्‍यांच्या भारत बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद…

543

राजुरा (ता.प्र) :– केंद्र सरकारने मंजूर केलेले वादग्रस्त तीन कृषी कायदे वापस घेण्यात यावे यासाठी दिल्ली येथे संपुर्ण भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलना अंतर्गत आज संपूर्ण भारतात एक दिवसीय बंद पुकारला आहे. या बंदला राजुऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राजुरा शहर आणि तालुक्यातील अनेक व्यापारी केंद्रे बंद होती. राजुऱ्यात महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला. कार्यकर्त्यांनी शहरात फीरून व्यापाऱ्यांना बंद पाडण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंचायत समिती चौक आणि परिसरात बाईक रॅली काढण्यात आली, शेतकरी समर्थनार्थ नारेबाजी करण्यात आली. अत्यावश्यक सेवा सोडून अन्य व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती.
या प्रसंगी काँग्रेसचे राजुरा पंचायत समितीचे उपसभापती मंगेश गुरणुले, राजुरा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष एजाज अहमद, कवडु सातपुते, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, लहू चहारे, भाऊराव आकनूरवार, प्रा. प्रफुल्ल शेंडे, सय्यद साबीर, शाहनवाज कुरेशी, आकाश मावलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देरकर, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आशिफ सय्यद, शहराध्यक्ष आसिष येमनुरवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष मेहमुद मुसा, स्वप्नील बाजुजवार, अंकुश भोंगळे, संदीप पोगला, रतिफभाई, बळवंत ठाकरे, सुजित कावडे, राजु गदगाळ यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.