भारत बंदच्या समर्थनार्थ गडचिरोली जिल्हा बंद शतप्रतिशत यशस्वी…

365

केंद्र शासनाने शेती व शेतक-यांच्या संदर्भात पारित केलेल्या तीनही काळ्या कायद्यांच्या विरोधात म्हणून आजच्या भारत बंद ला भाजप वगळता इतर सर्व राजकिय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला असुन गडचिरोली जिल्हा  बंद करण्याकरीता काँग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, शेकाप, भाकप, माकप, आप सहित काही रिपब्लिकन पक्षाचे नेते आज सकाळपासुनच रस्त्यावर ऊतरलेले आहेत . आजचा  बंद शांततापूर्ण करण्याचे  आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान गडचिरोली शहरातील नागरिकांनी स्वयंस्फुर्त प्रतिसाद देत बंद पाळण्यास सहकार्य केले आहे. गडचिरोलीत कांग्रेस नेते माजी आमदार डॉक्टर नामदेव उसेंडी, युकांचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, राकांपाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेन्द्र सुलभावार, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, शेकापची नेत्री जयश्री वेडधा, रोहिदास राऊत अहेरी येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आविस नेते दीपक आत्राम, जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, आरमोरीत जिल्हा महासचिव डॉक्टर महेश कोपूलवार, माकपचे महासचिव अमोल मारकवार यांचेसह आंदोलनाचे समर्थक ऊद्या रस्त्यावर ऊतरलेले दिसुन आले.

शेकापच्या महिला विंग ने लाल झेंडे फडकवत मोदी सरकारच्या विरोधात आपला आवाज बुलंद केल्याचे चित्र गडचिरोलीत पहावयास मिळाले. गडचिरोलीच्या गांधी चौकात संपन्न झालेल्या सभेत किसान कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन देऊन शेतकरी विरोधातील तीनही काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. या निवेदनावर डॉ नामदेव उसेंडी, महेंद्र ब्राम्हणवाडे, रोहिदास राऊत, नंदू वाईलकर, शेकापचे खजिनदार भाई शामसुंदर ऊराडे, भाई अक्षय रोहनकर, रविंद्र वासेकर, प्रभाकर वासेकर, प्रकाश ताकसांडे, सतिश विधाते, वामन सावसाकडे, देवराव चवळे सहीत अनेक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्ष-या आहेत.