घरटॅक्स, पाणी कर भरा, नाहीतर सरळ कोर्टात…

1091

-राजेंद्र झाडे (प्रतिनिधी)

गोंडपीपरी: गोंडपीपरी तालुक्यातील चेकपारगाव तसेच तालुक्यातील गावा गावामध्ये घर टॅक्स भरले नाहीतर सरळ फौजदारी कार्यवाही चालू करण्यात आली असून अनेकांच्या घरी सरळ कोर्टाच्या नोटीस जात आहे.
ग्रामपंचायत मधील गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून ओळखल्या जाणारे सरपंच पद हे नूकतेच रद्द झाले. त्यामुळे ग्राम सेवकांनी कुठलीही नोटीस न देता घरी सरळ कोर्टाची नोटीस येते आणि न्यायालयात हजर वा असा आदेश दिला जात आहे.
आम्ही घरटॅक्स आणि पाणी कर भरण्यासाठी तयार आहोत पण ग्राम सेवकांनी गावात एक मिटींग घेऊन आम्हाला कळवायला हवे होते पण आम्हाला न कळवता सरळ सरळ कोर्टात हजर होण्याची धमकी मिळत आहे. याबद्दल गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहे.
लाॅकडाउन काळात आम्ही घरटॅक्स व पाणी कर भरू शकलो नाही. आता एकवेळेस ५-८ हजार रुपयेची पावती ग्राम पंचायत च्या माध्यमातून आम्हाला मिळत आहे. सोबतच ग्रामपंचायत चे शिपाई यांच्याकडुन तुम्ही पैसे भरा अन्यथा उद्या कोर्टात हजर व्हावे अशी धमकी मिळतं आहे. आतापर्यंत आठ-दहा लोकांनी कोर्टात हजर करण्यात आले.
कोर्टात गेल्यानंतर करारनामा लिहून घेतात. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन आम्हाला पैसे भरण्यासाठी काही अवधी किंवा त्याची किस्त करून द्यावी हि विनंती आहे असे गावकरी म्हणत आहे.