देश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…

959

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्याप सुरू आहे. मात्र न्‍यूझीलंड कोरोना व्हायरस मुक्‍त देश ठरला आहे. न्‍यूझीलंड सरकारने कोरोना व्हायरसचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याने सर्व प्रतिबंध पूर्णपणे हटवले आहेत. न्‍यूझीलंड आता सतर्कतेच्या लेव्हल-1 मध्ये पोहोचला आहे. देशांच्या संदर्भातील अलर्ट सिस्‍टममधील सर्वात तळाचा स्तर आहे.

नव्या नियमांनुसार आता न्‍यूझीलंडमध्ये लोकांना एकत्र येण्यास कोणतेही बंधन नाही. तसेच सोशल डिस्‍टंसिंग पाळण्याचीही गरज नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र परदेशी येणाऱ्या सर्व सीमा बंद ठेवण्यात आल्या आहेत. न्‍यूझीलंडमध्ये गेल्या दोन आठवड्याहून अधिक काळात कोरोना व्हायरसचा कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही.

पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘जेव्हा आरोग्य विभागाकडून संपूर्ण देश कोरोना मुक्त झाल्याचे सांगण्यात आले तेव्हा मी आनंद रोखू शकले नाही, मी अक्षरश: नाचली.’

पंतप्रधान म्हणाल्या की, ‘आम्ही एका सुरक्षित आणि मजबूत स्थितीत आहोत. अर्थात अजूनही कोरोना व्हायरस पूर्वी असलेल्या स्थितीत परतणे इतके सोपे नाही. आता आमचं संपूर्ण लक्ष्य हे देशाच्या आर्थिक विकासावर असेल.’ त्यांनी सांगितले की, ‘अजून आमचे काम संपलेले नाही, मात्र त्याचवेळी कोरोना मुक्त देश करणे हे देखील मोठे यश आहे.’ या संपूर्ण काळात देशाच्या जनतेने देखील मोठे सहकार्य केले. त्यामुळे त्यांचे देखील आभार त्यांनी मानले.

दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर न्यूझीलंड कोरोनामुक्त होणारा पहिला देश होता. आता दुसऱ्या लाटेनंतर देखील न्यूझीलंड प्रथम कोरोनामुक्त देश ठरला आहे.