Homeचंद्रपूरगोंडपिंपरीसूरज ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे गोंडपिंपरी नगर पंचायत च्या सफ़ाई कर्मचार्‍यांना मिळाला न्याय...

सूरज ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळे गोंडपिंपरी नगर पंचायत च्या सफ़ाई कर्मचार्‍यांना मिळाला न्याय…

गोंडपीपरी:   गेल्या एक महिन्यापासून युवा स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सूरज ठाकरे यांच्या माध्यमातुन गोंड पिंपरी
मधील सफ़ाई कर्मचाऱ्यांचा तेथील प्रशासनाशी थकित वेतन तथा वेतन वाढ व पी. एफ. संदर्भात लढा सुरू होता या बाबत सूरज ठाकरे यांनी दिनांक 02/12/2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली होती व मोर्चा देखील काढला होता त्याची गांभीर्याने दखल उपजिल्हाधिकारी यांनी घेत कार्यवाही करीत कर्मचार्‍यांना त्यांचे पी. एफ. देण्याचे आदेश अधिकार्‍यांना दिले व अखेर सफाई कर्मचार्‍यांना त्यांचे पैसे मिळाले,
या मुळे परत एकदा युवा कामगार नेतृत्व सूरज ठाकरे यांच्या यशस्वी वाटचालीला आणखीन चालना भेटली आहे व सामन्यांचा विश्वास आणखीन बळकट झाला आहे,
*जो कोई ना करे वो ठाकरे करे*
असे घोषणाबाजी करत कामगारांनी सूरज ठाकरे यांचे आभार मानले व आजीवन त्यांचा सोबत जुळून समाजसेवेचे कार्य करण्याचे वचन दिले. या प्रसंगी युवा स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष नागेश इटेकर , मोहब्बत खान, राहुल चव्हाण, अजवान टाक, निखिल बजाइत,नितेश बेरड, रोशन हरदे, समीर देवगडे, स्वप्निल रामटेके, महेश ठाकरे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
खबरो की खोज मे..... हर. कदम.... 7666299045
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!