अबब …5000 रुपये ट्रॅक्टर रेती….

768

गोंडपिपरी (सुनील डोंगरे) कार्यकारी संपादक

गोंडपीपरी नगरपंचायतचे घरकुल मंजूर झाले ,घरांचे बांधकाम सुरु आहेत ..रेतीची अत्यंत आवश्यकता आहे ..तरी तालुका प्रशासन रेती संदर्भात काहीच निर्णय घेऊ शकत नाही .काय कारण कळायला मार्ग नाही .छुप्या पद्धतीने रात्री 12नंतर 5000रुपये प्रति ट्रीप प्रमाणे ट्रॅक्टरची वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे .
यासंदर्भात सविस्तर असे की ,गोंडपिपरी नगरपंचायतने अनेकांना घरकुल मंजूर केले आहे .खाजगी लोकांनी घरकामांना प्रारंभ केला आहे अर्थातच त्यांना रेतीची गरज आहे .प्रशासन रेतीसंदर्भात काहीच अधिकृत भूमिका घेत नसल्याचे कळते .
मग ट्रॅक्टरवाले जोखीम पत्करून गरजुंना रेती पुरवठा करत असल्याची विश्वसनीय माहिती आहे .प्रशासनाची परवानगी नसल्याने रात्री 12 च्या नंतर 5000रुपये प्रमाणे प्रति ट्रॅकर रेती पुरवठा करत असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीला अनेकांनी सांगितली आहे .
रेती खुली करावी अशी अनेक गरजूंची मागणी आहे .