उखर्डा ते नागरी माढेली बस सुरु करा-अभिजित कुडे

522

वरोरा: उखर्डा मार्गे बस सुरु करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यानी वरोरा आगर प्रमुख रामटेके यांच्या कडे केली. ग्रामीण भागातील विद्यार्थांना बस हा एकमेव पर्याय आहे . उखर्डा येथिल नागरीकांना प्रवासाचे दुसरे साधन उपलब्ध नाहीं विद्यार्थ्याना शाळेत सकाळी लवकर जावे लागते . नागरिकांचा व विद्यार्थांचा त्रास लक्षात घेऊन बस सुरु करावी .नागरीकांना प्रवासाचे साधन नसून या मार्गाने बस सुरु करावी अशी मागणी करण्यात आली . बस सुरु न केल्यास आंदोलनं करू असा इशारा अभिजित कुडे यांनी दिला .