खा.बाळू धानोरकर यांची पुढील लोकसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी; थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुध्द निवडणूक लढण्याची इच्छा…

3079

चंद्रपुर: काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीला उतरण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून लढायला तयार आहे, असं वक्तव्य बाळू धानोरकर यांनी केलं आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत तयारीसाठी फक्त 15 दिवस मिळाले होते. आता तयारीला तीन वर्षे बाकी आहेत. पक्षाने आदेश द्यावा, मी वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढायला तयार आहे, असं काँग्रेस खासदार बाळू धानोरकर म्हणाले.