धारधार शस्त्राने गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या…

890
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत राजबाबा बिअर बारसमोर एक धक्कादायक घटना घडली. धारधार शस्राने गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागपूर जिल्हा पूर्णतः हादरून गेला आहे. प्रशांत घोडेस्वर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रात्री उशिरा ही हत्या झाल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
ता. २० ला  रात्री उशिरा खापरखेडा येथे बाजार परिसरातील राजबाबा बिअर बारसमोर 30 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. प्रशांत घोडोस्वार असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे.रात्री उशिरा प्रशांत घरी जात असताना पाच आरोपींनी त्याला राजबाबा बिअर बारसमोर अडवून धरले. त्यावेळी आरोपींनी आधीचा जागेचा जुना वाद उकरुन काढत आधीच सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने प्रशांत घोडेस्वार याच्या गळ्यावर वार केले.
त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. मात्र, तोपर्यंत प्रशांतचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून हत्येचा तपास सुरु केला आहे.