सौ.शशिकलाताई गावतुरे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव अभिष्टचिंतन सोहळा संपन्न…

932

-उपसंपादक (सुरज पि. दहागावकर)
मुल- जेष्ठ कवियत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.शशिकला गावतुरे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेड, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या तर्फे अभिष्टचिंतन सोहळा मा.सा. कन्नमवार सभागृह, मुल येथे संपन्न झाला.

या प्रसंगी तेली,माली,माळी, कुणबी एकत्र येऊन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी एकत्र येण्याचे आवाहन माजी आमदार देवराव भांडेकर यांनी केले. माळी समाज हा प्रगतीपासून कोसोदूर असल्यामुळे या समाजाची प्रगती होऊ शकली नाही. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन विकास करावा असे मत अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकररावजी लिंगे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या औचित्याने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, होतकरू विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा तसेच स्टॉप सिलेक्शन कमिशनच्या (GD) माध्यमातून पॅरा मिल्ट्री फोर्स मध्ये निवड झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मंचावर ऍड.पुरुषोत्तम सातपुते, नरेन गेडाम, नामदेवराव जेंगठे, डॉ.सचिन भेदे, प्रा. विजयभाऊ लोनबले, अशोकराव येरमे, ग्रामगीताचार्य बडोपंत बोढेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभिलाषा गावतुरे, संचालन बळीराज निकोडे, ऍड. प्रशांत सोनूले आणि डॉ.समीर कदम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. सुरेश लोनबले यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण गावतुरे, प्रशांत गावतुरे, डॉ.अभिलाषा गावतुरे, डॉ.राकेश गावतुरे तसेच गावतुरे परिवार, राकेश मोहूर्ले, प्रा. विजय लोनबले, श्रीकांत शेंडे तसेच इतर समाज बांधवांचे योगदान लाभले.

कोण आहेत सौ. शशिकला गावतुरे

-सौ.शशिकला गावतुरे या जेष्ठ कवियत्री असून त्यांचे साहित्य क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे.

-सौ.शशिकला गावतुरे यांचे दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

-तसेच अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

-त्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्याध्यक्षा आहेत.

-सोबतच त्यांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतःच्या घरी मोफत वाचनालय सुरू केले.

-पहिले स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांना उच्चशिक्षित करून त्यांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा दिली.

-अश्या या जेष्ठ कवियत्री, सामाजिक कार्यकर्त्या असलेल्या सौ.शशिकला गावतुरे यांचा ७५ वा वाढदिवस सोहळा पार पडला.