खैरगावात बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुणांचा प्रहार मध्ये प्रवेश…

309

कोरपना: तालुक्यातील खैरगाव येथे अनेक शेतकरी व तरुणांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. प्रहार संघटनेचे काम व शेतकरी निराधार अपंग बांधव तरुण यांना आपलेसे वाटणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या तत्वावर प्रभावित होऊन अनेक शेतकरी तरुण यांनी प्रहार पक्षात प्रवेश केला.

या वेळी तरुणांनी गावात होणारा विकास व गावाच्या सामाजिक कामात प्रहार अग्रेसर राहणार असा विश्वास निर्माण केला. कोणत्याही गावकऱ्याला कोणतीही समस्या असल्यास त्यांनी प्रहार सेवकांशी सम्पर्क साधावा असे मत प्रहारचे माजी तालुका अध्यक्ष सतीश बिडकर यांनी आपल्या मार्गदर्शन करते वेळी केले. प्रहार सेवक इजि.अरविंद वाघमारे यांनी तरुणांना गावच्या विकासाठी कस लढायचं यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम चे आयोजन संजय अतकरे, अनिल गेडाम गणेश मुक्के यांनी केले.