ब्रेकिंग न्यूज! गोंडपिपरी भाजपाचे फसवे आवाहन; वीज तोडल्याने ग्राहकांत प्रचंड संताप

899

-सुनील डी डोंगरे (कार्यकारी संपादक )

गोंडपिपरी ‘लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल भरू नका ,वीज तोडली जाणार नाही ‘असे आवाहन तालुका भाजपा अध्यक्षाने जाहीरपणे केल्याने बऱ्याच वीज ग्राहकांनी वीजबिल भरले नाही .मात्र वितरण कंपनीने वीज बिल नं भरल्यास वीज तोडण्यात येईल असे नोटीस दिले आणि बिले भरण्याची मुदत दिली .तरीही भाजपने ‘कुणाचीही वीज तोडली जाणार नाही ‘असे जाहीर आवाहन केले .ग्राहक संभ्रमात सापडले आणि काहींनी भाजपाच्या आवाहनावर विश्वास ठेवून बिलाचा भरणा केला नाही .
इकडे वीज बिल भरण्याची मुदत संपल्यावर वीज कट करण्याची मोहीम वितरण कंपनीने सुरु केली .
10फेब्रुवारी रोजी स्थानिक पंचशील वॉर्डात बिल नं भरलेल्या अनेकांची वीज तोडण्यात आली .’वीज तोडली जाणार नाही ‘असे जाहीर आवाहन करणारे तालुका भाजप अध्यक्ष बबन निकोडे ,भाजपा कार्यकर्ते साईनाथ मास्टे हे वीज तोडताना प्रत्यक्ष हजर होते .तरी वीज तोडल्या जात होती .भाजपा कार्यकर्ते हतबल दिसत होते .
प्रश्न हा आहे ,कोणत्या आधारावर वीजबिल भरू नका असे आवाहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी केले ?आणि आता वीज तोडली गेली याची जबाबदारी कुणाची ?
भाजपच्या आवाहनावर विश्वास ठेवून आम्ही बिल भरले नाही ,आमच्या घरात आलेला अंधार भाजपमुळे आला अशी ग्राहकांची संतप्त प्रतिक्रिया आहे .