घुग्गुस येथे पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात निषेध मोर्चा…

385

घुग्गुस-पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी घुग्गुस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने गांधी चौकातून दुपारी 2 वाजता जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा जुना बसस्थानक मार्गे नवीन बसस्थानक चौकात दुपारी 3 वाजता समाप्त करण्यात आला.
पेट्रोल डिझेल गँसची दरवाढ़ कमी करा असे नारे लावण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्रीनिवास गोसकूला म्हणाले पेट्रोल डिझेल गँस दरवाढी विरोधात केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे. येणाऱ्या काही दिवसात पेट्रोल डिझेल गँस ची दरवाढ केंद्र सरकारने कमी नाही केल्यास पुढे यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी शहर सचिव रवी डिकोंडा, शहर उपाध्यक्ष मनोज सोनुले, एससी सेल तालुकाध्यक्ष सत्यनारायण डखरे, अल्पसंख्यांक सेलचे मोहम्मद इस्लाम अब्बास, महिला शहराध्यक्ष सुशीला डखरे, जोत्सना डखरे, छाया बोंडे, सुकुमार गुंडेटी, विल्सन नातर, उमाकांत आरमुल्ला, अरुण पेरका, अभिषेक माडगुलवार, उदय रामील्ला, रामनरेश कश्यप, स्पेस मादरवार, बुधराज कैथल व मोठ्या संख्येत नागरिक उपस्थित होते.