यवतमाळ : केळापूर तालुक्यातील पाटणबोरीलगतच्या जुनोनी शेतशिवारात गुरूवारी रात्री जागलीसाठी गेलेल्या दोन व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची माहिती पुढे येत आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळाकडे रवाना झाले. जखमींची नावे अद्याप कळली नाही. गेल्या काही दिवसांपासून मांडवी शिवारात एकाच ठिकाणी पाच वाघांनी बस्तान मांडले आहे. अनेकांनी या वाघांना एकत्रित पाहिले आहे