राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची जिल्हा कार्यकारीणी गठीत..जिल्हाध्यक्ष पदी प्रा. संतोष निखाते तर महासचिव पदी प्रा. अनिल डहाके यांची निवड

631

चंद्रपुर: नागपूर विभागातील सर्व सहा जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाईन बैठकी द्वारे राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषद महाराष्ट्र राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्य उपाध्यक्ष प्रा. शरद जोगी,कार्याध्यक्ष प्रा. भगवान चौधरी,महासचिव प्रा. पितांबर उरकुडे,प्रा.सुरेश नारायणे,नागपूर विभागीय अध्यक्ष प्रा.सुधीर अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थित निवड करण्यात आली.

चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी प्रा. संतोष नीखाते ,जिल्हा महासचिव प्रा. अनिल डहाके,उपाध्यक्ष प्रा. सुरेंद्र कळशे, प्रा. नीलकुमार पेचे,प्रा. विजय सोनटक्के,प्रा. एकनाथ खाडे, सचिव प्रा. संतोष सूर, प्रा. प्रकाश उपाध्ये, प्रा. राजेंद्र झाडे, प्रा. विनोद पेंदाम,कोषध्यक्ष प्रा. धनंजय खुणे,महिला अध्यक्ष प्रा. संगीता पुरी, कार्यालय प्रमुख प्रा. अतुल पिंपळकर, प्रसिध्दी प्रमुख प्रा. फूलभोगे,सोशल मीडिया प्रमुख प्रा.चरित्र नगराळे, सदस्य म्हणून प्रा. ज्योती वाघ,प्रा.इस्तारी पडोळे, प्रा. गेडाम, प्रा. श्रध्दा सुरावार,प्रा.कवडु पाटील, प्रा.अभिमन्यू येरणे,प्रा.साईनाथ कुंभारे,प्रा. स्नेहलता कोलप्याकवार प्रा. देशपांडे,प्रा. रवींद्र शेटे,प्रा. अविनाश धनोरे,प्रा. चोपराम कोचे, प्रा. मनिषा धामणगे, प्रा. रजनी पांडे, प्रा. पल्लवी आइंचवार यांची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. श्रुती मेहता उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गिरडे,पाहुण्यांचा परिचय प्रा. संध्या येलेकर सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कारेमोरे यांनी केले.