पाथरी ग्राम पंचायत वर ग्राम विकास आघाडीची सत्ता…

352

तालुका प्रतिनिधी

मागील पाच वर्षा पासून पाथरी तालुका निर्माण कृती संघर्ष समिति च्या माध्यमातून समितीचे अध्यक्ष प्रफुल तुम्मे आणि त्यांचे सहकारी पाथरी तालुक्याच्या निर्मितिसाठी आणि पाथरी गावाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.पाथरी गावाचा सर्वांगीण विकास होण्याचा दृष्टिकोण समोर ठेऊन,ग्राम विकास आघाडीची स्थापना करून ग्राम पंचायत निवडणूक लढवीली आणि मागील पाच वर्षात सत्तेत नसून सुद्धा जनतेची निस्वार्थ पणे कामे केली, त्याची पावती म्हणून पाथरी ग्राम वासियानी चार उमेदवार समर्थ पने निवडून दिले.

पाथरी ग्राम पंचायत ही 11 सदस्याची असल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी 6 सदस्य गरजेचे होते,पण पथरी तालुका निर्माण कृती समितीचे अध्यक्ष प्रफुल तुम्मे डगमगुन न जाता सत्ता प्रस्थापित करण्यासाठी अविरत प्रयत्न चालु ठेवून बहुमत सिद्ध केले,सरपंच पद महिला राखीव असल्यामुळे सौ.अनिता लोकनाथ ठीकरे ह्या सरपंच पदाच्या दावेदार झाल्या आणि प्रफुल तुम्मे हे उपसरपंच पदी विराजमान झाले.

सदस्यगण प्रमोदवाघमारे,सौ.अलका वाघधरे,सौ.प्रीति लाडे, मा.मिलिंद ठीकरे. इत्यादी सदस्यांच्या बळावर आणि प्रफुल तुम्मे यांच्या नेतृत्वात पाथरी ग्राम पंचायत वर ग्राम विकास आघाडीची सत्ता प्रस्थापित झाली.पाथरी गावाचा सर्वांगीण विकास प्रफुल तुम्मे यांच्या हातुन घडावा हीच अपेक्षा जनतेकडूम व्यक्त केल्या जात आहे.