मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात काळवीटाचा दुर्दैवी मृत्यु…

541

नागेश इटेकर /प्रतिनिधी

गोंडपिपरी – येथील साई नगरी परिसरात आज सकाळ ८.३० वाजताच्या सुमारास भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी एका काळवीट वर हल्ला करत त्याला ठार केल्याची घटना घडली आहे.

मृत काळवीटवर हल्ला चढविलेल्या मोकाट,शिकारी कुत्र्यां पासुन वाचविण्याचा साई नगरीतील नागरिक तसेच नगर सेवक तथा भाजपा नेते राकेश पून यांनी सुद्धा शर्यतीचेआणि पुरेपूर प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. शेवटी त्या काळवीटचा दुर्दैवी अंत झाला.

जंगली, मुक्या जनावराचा असा नजरेसमोर जीव गेल्याने साई नगरीतील नागरिकांत हळहळ व्यक्त केल्या जात आहे. सदर मृत काळवीट चा पंचनामा करण्यासाठी राकेश पुन यांनी वण कर्मचाऱ्यांना फोन व्दारे कळवले असता वण कर्मचारी घटनस्थळी येऊन मृत काळवीटाला ताब्यात घेऊन पंचनाम्यास नेले आहे.
समोरील कार्यवाही गोंडपिपरी चे सहाय्यक वण संरक्षक श्री ढाले यांच्या मार्गदर्शनात केला जात आहे.