चंद्रपूर:-आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तुकुम परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, महिला अध्यक्ष ज्योती रंगारी, महिला कार्याध्यक्ष चारुशीला बारसागडे, विधानसभा उपाध्यक्ष निमेश मानकर, किसान सेल जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल एजाज, व्ही जे एन टी जिल्हाध्यक्ष रवी नाचपेलवार, विद्यार्थी अध्यक्ष राम इंगळे, विधानसभा सचिव संजय तुरीले तसेच प्रभागअध्यक्ष, वॉर्ड अध्यक्ष आणि वॉर्डातील नागरिक उपस्थित होते.