चंद्रपुर याेध्दा संघटनेच्या वतीने राेग निदान व आराेग्य तपासनी शिबिर

471

चंद्रपुर याेध्दा संघटनेच्या च्या वतीने दिंनाक २१/०२/२१ रविवारला सकाळी ११:०० वाजेपासुन राेग निदान व आराेग्य तपासनी शिबिर स्थानिक पंचशिल चाेैक,चंद्रपुर येथिल चाेखामेळा मुलांच्या वस्तीगृहाचा पटांगणावर हाेत आहे. या शिबिराला चंद्रपुरकरांनी उपस्थित राहुन आपल्या नवजात शिशु, युवावर्ग, तसेच वयाेवृध्दानी आपल्या आराेग्याचे निदान करून व याेग्य ती तपासनी चंद्रपुर येथिल नामाकिंत डॉक्टर च्या माध्यमातुन करून घेण्याची विनंती चंद्रपुर याेध्दाचा वतीने चंद्रपुरकरांना करण्यात आली आहे.

या राेग निदान व आराेग्य तपासनी करिता येतांना शिबीरार्थिनी मास्क लावने गरजेचे आहे. शिबिरस्थळी लाभार्थ्यानी आपसात अंतर ठेवुन आपली तपासनी करायची आहे. सॅनेटायझर ची व्यवस्था आयाेजकांचा मार्फत करण्यात येईल. शिबिरात येणार्या युवक युवतींना चंद्रपुर याेध्दा संघठनेचे सदस्य व्हायची मनापासुन ईच्छा असेल त्यांनी वार्षिक २० रूपये शुल्क भरून त्यांना सदस्य हाेता येईल.

चंद्रपुर याेध्दा ह्या संघटनेत चंद्रपुर जिल्ह्यातिल प्रत्येक युवक व युवती नी संघठनेचे ध्येय व उदिष्ट समजुन व कार्य प्रणाली बघुन सदस्य व्हावे असे संघठनेचे तर्फे कळविण्यात आले. चंद्रपुर याेध्दा ह्या संघटनेत चंद्रपुर जिल्ह्यातिल प्रत्येक तालुक्यात, गावात, चद्रपुर याेध्दा असतील. समता, न्याय, हक्क, लढा या तत्वावर चंद्रपुर याेध्दा चा लढा शासन प्रशासन व संधीसाधु राजकारण्यासाेबत असेल. चंद्रपुरातिल जनसामान्यांसाठी व त्यांच्या हितासाठी काय करता येईल या करिता अनेक कार्यक्रम वर्षभर राबवण्याचा मानस संघठनेनी केला आहे. आंदाेलन उपाेषन न करता देशातिल समस्त महापुरूषांंचे विचार घेवुन संविधानिक पध्दतीने प्रश्न साेडवण्याचे चंद्रपुर याेध्दा नेहमिच प्रयत्न करेल…..