ब्रह्मपुरी : काल 20 फेब्रुवारीला अवैध दारू तस्करी होणार अशी गुप्त माहिती ब्रह्मपुरी पोलिसांना मिळाली असता सोनेगाव नदिघाट रोडवर पोलिसांनी नाकाबंदी करीत सापळा रचला.
संशयित चारचाकी वाहन मारोती अल्टो क्रमांक एमएच 31 एएच 2298 चा पाठलाग केला असता सदर वाहनाला थांबविण्यात आले असता वाहनात उखर्ड बॉक्स 700 निप देशी दारू आढळून आली. सदर दारूची किंमत 70जार रुपये आहे. या दारू तस्करीत 29 वर्षीय प्रेमदास अवसरे, मारोती अवसरे, फरीद शेख यांना अटक करण्यात आली असून आकाश सीडाम हा धेटनास्थळाहून फरार झाला. महाराष्ट्र दारू कायदा अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्यात अवैध दारू सहित वाहन असा एकूण 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे, मुकेश गजबे अमोल गिरडकर, विजय मैट अजय कटाईत. संदेश देवगडे, योगेश शिवणकर यांनी यशस्पीपणे पार पाडली.
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी ब्रह्मपुरी पोलिसांनी केली अवैध दारू तस्करांना अटक, 2 लाख 70 हजारांचा मुद्देमाल...