अल्पवयीन युवतीवर अत्याचार,फरार आरोपीस अटक…

527

सिंदेवाही:येथील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बळबजबरीने अत्याचार करणारा फरार आरोपी सुमित नागदेवते याला पोलिसांनी नागपूर येथून अटक केली आहे.

पिडीत युवतीचा मित्र सुमित नागदेवते(21) रा.जामसाळा याने अल्पवयीन मुलीला प्रेम जाळ्यात आेढले ,तिला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने जबरीने अत्याचार केला.याची माहिती कुटूंबियांना देताच पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.परंतू यावेळेस आरोपी फरार झाला .पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर नागपूर येथून त्याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पुनम पाटील,पोक्सो तपास पथक व पोलिस स्टाफ सतिश गुरनुले व विनोद गुरनुले हे करीत आहे.

या गुन्ह्याच्या एका दिवसापुर्वी पिडीत अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहणारा प्रणय खेब्रागडे (25) याने आेळखीचा फायदा घेऊन पिडीतेवर अत्याचार केला.या प्रकरणात त्याला अटक केली होती.