धाड टाकून सागवानासह एक लाखाचे लाकूड जप्त

508

ब्रह्मपुरी : तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत रामपुरी येथे एका व्यक्तीच्या घरावर धाड टाकून लाखो रुपयांचे उच्च प्रतीचे सागवानासह अन्य लाकूड जप्त करण्यात आले. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा करण्यात आली. यामध्ये विविध जातीच्या चिरान पाट्या ०.६०३ घ.मी. व सागवानचे लट्टे १.२१ घ.मी., असे एकूण सुमारे एक लाखांचे लाकूड जप्त करण्यात आले.
रामपुरी येथील होमदेव पत्रे याच्या घरी रात्रीला जंगलातून अवैधरीत्या कटाई करून चोरून आणलेले लाकूड असल्याची माहिती ब्रह्मपुरी वनविभागाला मिळाली. या आधारे फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी आशुतोष मेढे यांनी जंगलव्याप्त परिसरातील रामपुरी येथे रात्रीच्या सुमारास सापळा रचून धाड टाकली. दरम्यान, उच्च प्रतीचे सागवान व अन्य जातीचे लाकूड सदर इसमाच्या घरी आढळून आले. याप्रकरणी होमदेव पत्रे याच्यावर वनअधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई करण्यात येऊन
वनगुन्हा दाखल आला. त्याच्या घरी सापडलेले सागवान लाकूड जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई ब्रह्मपुरी वनविभागाचे मुख्य उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बांगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी वनविभागाच्या फिरत्या पथकाचे प्रमुख वनपरिक्षेत्र अधिकारी मे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली
सदर घटनेचा पुढील तपास सहायक वनसंरक्षक रामेश्वरी बोंगाले यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर वनपरिक्षेत्र अधिकारी पूनम ब्राम्हणे करीत आहेत.