धक्कादायक! पुजा चव्हाण पाठोपाठ टिक-टॉक स्टार समीर गायकवाडची आत्महत्या…

1036

पुणे, 21 फेब्रुवारी : पुण्यातील टिकटॉक स्टार समीर गायकवाड याने आत्महत्या केली आहे. 22 वर्षीय समीरने रविवारी सायंकाळी 5 वाजता आपल्या राहत्या घरात पंख्याला साडी बांधत गळफास घेऊन जीवन संपवलं.

समीर गायकवाड हा टिक-टॉक व्हिडिओच्या हटके स्टाईलमुळे अल्पावधीतच तरुणाईमध्ये लोकप्रिय झाला होता. टिकटॉकवरील त्याचे अनेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्यामुळे तो कायमच चर्चेत असत. मात्र आता त्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

टिकटॉक स्टार असणाऱ्या समीरने प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. समीर गायकवाड हा पुण्यातील वाडिया कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता.