जिल्हास्तरीय ऑनलाईन वादविवाद स्पर्धेत जिवतीचा सिद्धार्थ चव्हाण अव्वल…

455

राजुरा:- नेहरू युवा केंद्र चंद्रपूर तर्फे आयोजित युवा सप्ताह निमित्त अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.त्यात घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील पदवीचे शिक्षण घेत असलेला सिद्धार्थ राहुल चव्हाण या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावला.

यापूर्वी सिद्धार्थने महाविद्यालयात व इतर अनेक क्षेत्रात सहभाग घेत वादविवाद स्पर्धेत प्रावीण्य मिळविले आहे. सदर वादविवाद स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सभागृहाच्या मते आजची ऑनलाईन शिक्षण प्रणाली योग्य की अयोग्य हा विषय स्पर्धेसाठी आयोजित केलेला होता.

विषयाच्या विरुद्ध बाजूस बोलून सिद्धार्थने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी मित्र , आईवडील यांनी सिध्दार्थ चे कौतुक केले.