आदित्य आवारीची ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड…

304

राजुरा: राजुरा येथील युवा कवी आदित्य दिनकर आवारी यांची नाशिक येथे पार पडणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘कविकट्टा’ काव्य मंचावर ‘देश माझा’ या कवितेच्या सादरीकरणासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे आदित्यचे वय अवघे १८ वर्षे असून मागील वर्षीच त्यांची ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवड झाली होती. कोरोना प्रादुर्भावामुळे दि. २६,२७,२८ मार्च २०२१ रोजी होणारे नियोजित साहित्य संमेलन स्थगित करण्यात आले आहे. अ. भा. म. साहित्य संमेलनाची दिनांक व वेळ नव्याने जाहीर होणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे.