राजुरा :- राजुरा येथील महिलांच्या आयोजित एका कार्यक्रमात मार्च २०१५ मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजुरा येथे आले होते. राज्यात पहिल्यांदा महिला बचत गटासाठी भव्य मॉल निर्माण करण्याची घोषणा त्यावेळी केली होती. यासाठी १ कोटी निधी देण्याचे माजी मुखमंत्र्यांनी जाहीर केले त्या मंचावर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार संजय धोटे उपस्थित होते मात्र आपल्या ५ वर्षाच्या कार्यकाळात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेची साधी पुर्तता माजी आमदार करू शकले नाहीत यावरून माजी आमदारांची विकासाप्रती निष्क्रियता लक्षात येते. आपली अकार्यक्षमता लपवण्यासाठी कॉंग्रेसच्या विकासकामांचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न माजी आमदार संजय धोटे करीत आहेत. हे या क्षेत्राचे दुर्दैव आहे माजी आमदारांनी स्वताच्या विकास कामांचा खुलासा करावा त्यानंतर कॉंग्रेसच्या विकास कामांबाबत बोलावे असे आवाहन तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांनी केले आहे.
राजुरा येथील पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय जागेचा प्रश्न गेली अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याचा सुद्धा सातबारा ते सन २०१३ पासून बनवू शकले नाहीत. सुभाषभाऊ आमदार झाल्यावर सदर जागेविषयी सातत्याने पाठपुरावा करून सातबाऱ्यावर संबंधित विभागाच्या जागेची नोंद करायला त्यांनी भाग पाडले. पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकामासाठी ४ कोटी ची प्रशासकीय मान्यता २५ फेब्रुवारी २०२१ रोजी प्राप्त करून घेतली आहे. सुभाषभाऊंनी जनतेच्या प्रश्नांवर युद्धस्तरावर झटून क्षेत्रात विकासकामे केली आहेत. माजी आमदारांप्रमाणे जनतेला केवळ पोकळ घोषणा करून भुलथापा दिल्या नाहीत.
उपजिल्हा रुग्णालयासंदर्भात स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा येथील आयोजित कार्यक्रमात सुभाषभाऊंनी मागणी केल्यानुसार श्रेणीवर्धीत १०० खाटांच्या उपजिल्हा रूग्णालय देण्याबाबतची घोषणा राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिनांक १९ डिसेंबर २०१० रोजी केली होती. त्या अनुषंगाने राजुरा येथे उपजिल्हा रुग्णालय निर्माण करण्याची कारवाई सुरू झाली परंतु सातबाऱ्याच्या अडचणीमुळे प्रशासकीय मंजुरी देण्यास अडचण होत असल्याची बाब निदर्शनास येताच भाऊंनी तत्कालीन महसुल आयुक्त यांच्याशी चर्चा करून संबंधित जागेचा सातबारा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांना दिले. त्यानुसार आराजी ०.९९ हेक्टर आर जागेची सातबारा नोंद दिनांक ११ जुलै २०१३ रोजी वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय राजुरा यांच्या नावे घेण्यात आली. दिनांक १५ जानेवारी २०१४ रोजी ८ कोटी ४३ लक्ष ४६४ या किमतीच्या अंदाजपत्रक व आराखड्यास प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव सहसंचालक, आरोग्य सेवा रुग्णालय मुंबई यांचे कडून अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडे सादर करण्यात आला.
त्यानुसार दिनांक २ सप्टेंबर २०१४ रोजी सदर प्रस्तावास प्रशासकिय मान्यतेसह ७ कोटी ५८ लक्षाचा निधी प्राप्त झाला. ५ सप्टेंबर २०१४ रोजी सदर कामाचे विधिवत भूमिपूजन करण्यात आले होते. कोणत्याही प्रकल्पाच्या वाढिव किमंतीनुसार संबंधित बाबींची पुरवनी अर्थसंकल्पात तरतूद करणे नैसर्गिक बाब आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने पुरवनी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे त्यांची जबाबदारीच असते. वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरण्यासंदर्भात यांनी कोणत्याही प्रकारचा ठोस पाठपुरावा केला नाही. त्यामुळे पदभरती रेंगाळली होती. सुभाषभाऊ आमदार होताच आयुक्त कुटुंब कल्याण व संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान, संचालक आरोग्य सेवा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पदभरतीसाठी आग्रह धरला व रेंगाळलेली पदभरती मार्गी लावली. कोरोना काळात राजुरातील नागरिकांसाठी ऑक्सिजन युक्त कोविड सेंटर उपलब्ध करून दिले.
==============================
काँग्रेसच्या कामाची फलश्रुती भाजपाने घेण्याचा डाव फसला.
राजुरा येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाची मंजुरी तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांचे काळात दिनांक १७ जानेवारी २०१३ अन्वये अस्तित्वात असलेल्या ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालय राजुराचे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मान्यता देण्यात आली होती. तद्नंतर २ सप्टेंबर २०१४ रोजी ७ कोटी ५८ लाखाची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी माजी आमदारांनी वर्तमान पत्रात दावा केल्याप्रमाणे मुनगंटीवार हे वित्तमंत्री नव्हते आणि संजय धोटे हे आमदारही नव्हते. तरीही आपण बांधकामास दिनांक २ सप्टेंबर २०१४ रोजी प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याचे व भाजप सरकार च्या कामाचे फलित असल्याचे एका दैनिकात भासविले आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कामाची फलश्रुती घेण्याचा माजी आमदारांचाच डाव फसल्याचे उघड होते. यांच्या अकार्यक्षमतेची जानीव स्थानिक नागरिकांना झाल्यानेच जनतेने यांना निवडणूकीत धडा शिकविला आहे.