५६ किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेमध्ये लाठीचा श्रीराम बालक आकडा अव्वल…

589

आकाश कडुकर (धाबा-लाठी प्रतिनिधी)

राजे क्रीडा मंडळ व नवयुवक क्रीडा मंडळ कळमना, यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मण नेवारे यांच्या पटांगणावर अ आणि ब असे दोन गटांचे भव्य कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या अशा चाललेल्या या दोन दिवसीय कबड्डी सामन्यामध्ये लाठीचा जय श्रीराम बालक आखाडा लाठी हा संघ स्वप्नील आसवले यांच्या मार्गदर्शनामुळे अंतिम फेरीचा विजयी संघ ठरला…
मुळात लाठीची माती ही खेळासाठीच प्रसिध्द आहे ,आणि भास्कर पेंदोर यांच्या मार्गदर्शनात हीच परंपरा लाठीचा नेतृत्वाने कायम राखली आहे. विजय संघाला शिवाजी राजे क्रीडा मंडळ, कळमना यांच्या वतीने १५००० रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.

या दोन दिवसीय कबड्डी सामन्याला उद्घाटक म्हणून वैशालीताई बद्दलवार जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, सह उदघाटक म्हणून श्री उमेश पाटील पोलिस निरीक्षक बल्लारपूर, अध्यक्ष म्हणून घनश्याम जी मूलचंदानी माजी नगराध्यक्ष नगर परिषद बल्लारपूर आणि उपाध्यक्ष म्हणून अॅडव्होकेट भाले मॅडम बल्लारपूर या उपस्थित होत्या..