पतीने पत्नीवर ब्लेडने केले वार; सिंदेवाही तालुक्यातील प्रकार…वाचा नेमकं काय घडले?…

809

सिंदेवाही: भावी सुखी संसाराची स्वप्ने रंगवित असतांना विवाहानंतर अवघ्या एका दिवसानेच बाहेर फिरायला सोबत आली नाही म्हणून पतीने नववधू असलेल्या पत्नीचे तोंड दाबून गळ्यावर ब्लेडचे सपासप दोन वार करून प्राणघातक हल्ला केल्याने पिडीत पत्नीने पोलिस स्टेशनला तक्रार दिली.पोलिसांनी पतीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सदर खळबळजनक  घटना सिंदेवाही तालुक्यातील लोनवाही येथे घडली.

प्रमोद माधव आत्राम (28) यांचा एका दिवसापुर्वीच विवाह आटोपला. पती-पत्नी फिर्यादीचे लोनवाही येथे राहते घरी असतांना  सकाळच्या सुमारास आरोपी पतीने पत्नीला बाहेर फिरायला जाऊ,असे म्हटले.

परंतू फिर्यादी पत्नी हिने एका दिवसापुर्वीच लग्न झाले असल्याने बाहेर जाता येणार नाही,असे सांगितले. यागोष्टीमुळे राग अनावर होऊन पतीने  पत्नीचे पाठीमागून तोंड दाबले. व तिचे गळ्यावर दोन वेळा ब्लेडने वार करून तिला जखमी केले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत पत्नीने पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली.

प्रकरणात पोलिस स्टेशनला पोहचले असून सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे पतीविरूध्द कलम 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.