त्या गुन्हेगारी वृत्तीच्या सुपरवायझर वर गोंडपिंपरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

1547

नागेश ईटेकर/तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी : येथील नगर पंचायत अंतर्गागत कंत्राटी सफाई कामगारांवर देखरेख ठेवण्यासाठी म्हणून स्थानीक तिरुपती झाडे या व्यक्तीला कामगार निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.परंतु दिनांक ५/३/२०२१ रोजी सफाई कामगारांवर होत असलेल्या अन्यायावर पेटून उठून उपोषणाचा मार्ग स्वीकारले त्या कंत्राटी कामगारांची पिळवणूक या तिरुपती झाडे नामक कामगार निरीक्षक कडून होत असल्याची तक्रार स्थानीक पोलिस ठाण्यात केली असून त्याचेवर अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आली आहे. तिरुपती झाडे याचेवर पूर्वी दारू विक्रीचे जुने गुन्हे दाखल असताना देखील पोलीस वेरिफिकेशन न करता सफाई कर्मचाऱ्यांवर निरीक्षणा करिता सुपरवायझर म्हणून त्याची नियुक्ती कशी काय करण्यात आली हे सध्या चर्चेचा विषय आहे.

तिरुपती झाडे हा आधीपासूनच गुन्हेगार प्रवृत्तीचा असून आज तिरुपती झाडे याने पगार देतो म्हणून महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना कचरा व्यवस्थापन डेपोकडे बोलावले असता तो स्वतः आणि त्याचे सासू व इतर समर्थकांना घेऊन सफाई कर्मचाऱ्यांवर हल्ला चढविला.दरम्यान विषय अटी तटी चा झाला.संबंधीत प्रकरणाच्या माहिती ची दखल घेत उपविभागीय पोलिस अधिकारी श्री अनुज तारे यांना सुरज ठाकरे यांनी भ्रमणध्वनीवरून सर्व घडलेला प्रकार सांगितला.समस्त सफाई कर्मचाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व दारू विक्री पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या तिरुपती झाडे विरोधात आज गोंडपिंपरी येथील पोलीस स्टेशन मध्ये पुन्हा तक्रार केली. तक्रारी होऊन देखील कार्यवाही होत नसल्या बाबत सुरेश ठाकरे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना निदर्शनात आणून दिले आहे.

गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांना शासकीय कंत्राटी मध्ये कामावर ठेवू नये असा नियम असताना देखील कुठलेही पोलीस वेरिफिकेशन न करता कामगारांनी आक्षेप घेतल्यानंतर देखील कंत्राटदाराने कोणाच्या दबावाखाली सदर व्यक्तीला कामावर ठेवले हा एक चर्चेचा विषय सर्वत्र गोंडपिंपरीमध्ये रंगलेला आहे. लवकरच जय भवानी कामगार संघटनेचे अध्यक्ष सुरज ठाकरे हे सदर गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीवर 107 किंवा 110 कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करावी याकरता उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे या ठिकाणी त्यांनी सांगितले अशा पद्धतीची लोकही समाजाला देखील हानिकारक असतात व कायदेशीर रित्या चालू असलेल्या आंदोलनाला बेकायदेशीरपणे करण्याचा प्रयत्न व हिंसक वळण देण्याचा प्रयत्न अशा पद्धतीची लोक करीत आहेत हे यावरून सिद्ध होते असे त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे .

नमूद गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुपरवायझरला कामावरून कमी न केल्यास भविष्यामध्ये मोठी गंभीर हिंसक भांडणे हा सुपरवायझर करू शकतो अशी दाट शंका सुरज ठाकरे यांनी व्यक्त केली व या सुपरवायझर पासून इतर कामगारांना जीवित हानी देखील होऊ शकते प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना कामावर ठेवू नये अशी विनंती सुरज ठाकरे यांनी पोलीस विभागाला व नगरपंचायत गोंडपिंपरी यांना केली असून या बाबतचे पत्र आज जिल्हाधिकारी यांना देखील मेल द्वारे पाठविण्यात आले आहे व लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर टाकून कायद्याची अंमलबजावणी व्हावी याकरता पोलीस वेरिफिकेशन सर्वत्र अनिवार्य व सक्तीचे करावे हा कायदा आधीपासून असताना त्याची अंमलबजावणी कृपया जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तेने करायला व्हावी याकरता निवेदन देणार आहेत.