चंद्रपुर: आंदोलकर्ता कोरोना योध्दांची रास्त मागणी मार्गी काढत त्यांचे आंदोलन सोडविण्याच्या दिशेने आमदार किशोर जोरगेवार यांच्या मुंबई येथे सातत्याने गतीशील हालचाली सुरु असून आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर विषयासंदर्भात वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्याशी याधीच बैठक केली आहे. तर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमूख यांच्याशी बैठकीच्या माध्यमातून चर्चा केली. यावेळी ना. अमित देशमूख यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून तात्काळ नवीन कंत्राट काढत आठ दिवसाच्या आत येथील कर्मचा-यांचे वेतन अदा करण्याचे आदेश ना. अमित देशमूख यांनी संबधित विभागाला दिले आहे. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक, डॉ. तात्याराव लहाने यांचीही उपस्थिती होती.
थकीत वेतन अदा करण्यात यावे या प्रमूख मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय येथील कंत्राटी कर्मचा-यांचे पप्पू देशमूख यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालया समोर कुटुंबासह डेरा आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन सुटावे याकरीता आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी सदर आंदोलनाला भेट देत आंदोनकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या समजून घेत आंदोलन मंडपात आंदोलनकार्त्यासह भोजन केले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही आमदार किशोर जोरगेवार यांनी हा विषय उचलत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. तसेच या विषयाचा त्यांच्याकडून सातत्याने पाठपूरा सुरु आहे. हा विषय सुटावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशीही चर्चा केली. विजय वडेट्टीवार यांचेही या दिशेने प्रयत्न सुरु आहे. दरम्याण आज आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमूख, यांच्याशी बैठक करत या आंदोलनाची सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून जुन्या कंत्राटातील घोळामूळे वेतन रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे तात्काळ नवीन कंत्राट काढत आठ दिवसाच्या आत येथील कर्मचा-यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश ना. अमित देशमूख यांनी दिले आहे.