संतोष बोडगेवार
ग्रामीण प्रतिनिधी/बोरी
अहेरी तालुक्यातील बोरी आणि रायपुर पॅच गावातील रमाई,पंतप्रधान,शबरी इत्यादी आवास योजनेअंतर्गत घरकुलाचे बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांन वाळू मिळत नसल्याने येथील तीस ते चाळीस लाभार्थ्यांनी सही अंगठ्या निशी तहसीलदार यांना निवेदन देत शासनाकडून मिळणारी पाच ब्रास वाळू त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ग्राम पंचायत च्या वतीने मंजुर विविध योजनेतिल घरकुलाचे बांधकाम सध्या शहराच्या तसेच ग्रामीण भागात विविध ठिकाणी सुरू आहे. परंतु घरकुल बांधकामासाठी लागणारी वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेकाचे घरकुल बांधकाम अर्धवट झाले तर काहींनी सुरुवात करून थांबविले आहे.अवैध मार्गाने मिळणाऱ्या वाळूचे भाव सध्या गगनाला भिडले आहे सात हजार ते आठ हजार प्रती ब्रास वाळू या लाभार्थ्यांना घेण्यास परवडत नसल्याने अनेकाचे बांधकाम सध्या जैसे थे च्या स्थितीत आहेत.
त्यातच शासनाकडून मिळणारी पाच ब्रास वाळू ही या लाभार्थ्यांना मिळत नसल्याने याचा सर्वात जास्त फटका रमाई, पंतप्रधान, शबरी इत्यादी आवास योजनेतील लाभार्थ्यांना बसत आहे. लाभार्थ्यांनी आधीचे जुने घर मोडून घरकुल बांधकामासाठी जागा मोकळी केली परंतु घरकुलाचे बांधकाम होत नसल्यामुळे काहींचा संसार उघड्यावर आला आहे. आता तर ऐन उन्हाळ्याच्या मौसमात, तापत्या सूर्याच्या छत्रछायेखाली दिवस काढण्याची माणुसकी त्यांच्यावर ओढवली आहे.याची शासनाने त्वरित दखल घेऊन शासन निर्णय प्रमाणे घरकुल बांधकामासाठी मिळणारी पाच ब्रास वाळू त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी स्थानीक लाभार्थ्यांनी तहसीलदार ओमकार ओतारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात महेश बाकिवार,गणपती तोकलवार,राजन्ना पैडीवार,अशोक येंडळवार, मल्ला मंचारलावार,शंकर तालावार,शालुबई बकिवार,दशरथ येल्लेलवार,शैलेश रामगोंनवार, रमेश सदनपवार,शंकर गंगाधरिवार,रमेश गोटमवार,गंगाराम गुरनुले,पूनाजी आदे,लीलाबाई कोलपाकवार,सोमा कंपेलवार, येसू आदे, आदींसह 30 ते 40 लाभार्थ्यांच्या सह्या आहेत.