गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी यांच्यावरील अन्याय खपवून घेणार नाही-आमदार डॉ देवराव होळी

421

गडचिरोली- ज्या शेतकऱ्यांचे धान विक्री करिता सात बारा ऑनलाईन करून अजूनपर्यंत धान खरेदी केली केली नाही अश्या सर्व शेतकऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी.
धान खरेदी मुदत वाढ करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन.
गडचिरोली जिल्ह्यात फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ
मार्फत चालू आर्थिक वर्ष 31 मार्च 2021पर्यंत सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांचे धान खरेदी.
मुदत आहे यावर्षी महाविकास आघाडी सरकार ने धान खरेदी करिता किचकट प्रक्रियाचा अवलंब केला त्यामुळे फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ यांना खूप त्रासाचा सामना करावा लागला व जिल्ह्यात यावर्षी गोडाऊनची उपलब्धता होऊ शकली नाही व अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी आपला धान विक्री करण्यापासून वंचित आहेत व सध्या जिल्ह्यातील शेतकरी धान विक्री करू न शकल्यामुळे हवालदिल झाले व हजारो शेतकऱ्यांनी आपला धान विक्री करिता आपला सात बारा दिला आहे व आपला धान विक्री करिता वाट बघत आहेत त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल करावी असे आव्हान गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी पत्रकाद्वारे केले व गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळ चे धान खरेदी मुदत वाढवून देण्यात यावे अन्यथा गडचिरोली जिल्ह्यात शेतकऱ्यांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार डॉ देवराव होळी यांनी दिला.