बेंबाळ पोलिसांची उल्लेखनिय कामगिरी.. दारूची तस्करी व गावागावात फिरून दारु विक्री करणाऱ्या शेखर पाल रा.जुनगाव यास अटक

936

मुल प्रतिनीधी

मुल – कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने दारू सह ईतर आवश्यक तथा जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दिलेल्या वेळेनुसार आणि ठराविक कालमर्यादे पर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.परंतु अवैध मार्गांनी दारू विक्री करणाऱ्यांचे धंदे अद्यापही सुरूच आहेत. ताळेबंधीचा फायदा घेत काही तस्कर गाडीने फिरून मद्यपींना अव्वाच्या सव्वा भावाने गावात दारू विक्री करत असल्याचे दिसून आले आहे.मुल पोलिस स्टेशन मधील बेंबाळ पोलिस चौकी हद्दीतील जुनगाव या गावात धाड टाकून दुचाकी वाहन क्र.MH- 34 AK- 0626 मधुन दारूची विक्री करणाऱ्या एकास बेंबाळ पोलिसांनी अटक केली आहे .

शनिवार ला रात्रो माहिती मिळाली कि, जुनगांव मार्गाने दुचाकी वाहन क्र. MH- 34 AK- 0626 या दुचाकीने फिरून मोहाची दारू विक्री करत असल्याचे कडताच बेंबाळ पोलिस ठाण्यातील पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारला असता वाहन क्र. MH-34 AK- 0626 या दुचाकि सह सत्तर लिटर मोहाची दारु सापडली सदर धाडसत्र उपनिरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. परचाके,पो.हवा. जुमनाके, पोलिस मित्र सिध्दु फडके यांच्या सह राबविण्यात आली.

पोलिसांनी दुचाकी क्र. MH-34 AK- 0626 व दारूचा साठा असा 90 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.मोह फुलाची दारू तस्करी व गावागावात दुचाकीने फिरून विक्री करणाऱ्या शेखर पाल रा. जुनगांव यास अटक करून त्याचेवर मुं.दा. का.अन्वये गुन्हा नोंद केला आहे.