ब्रेकिंग: बल्लारपूर रेल्वे ट्रॅकवर आढळला बेवारस व्यक्तीचा मृतदेह…

1210

बल्लारपूर :- बल्लारपूर हद्दीत रेल्वे ट्रॅकवर एक इसम चा पाय कटुन अवस्थेत आढळून आला. त्याला चंद्रपूर सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरानी त्याला मृत्यू घोषित केले. त्याचा मृत्यू अति रक्तस्त्राव व हृदय विकाराने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. रेल्वे पोलिसांना मृतकाची अजून पर्यंत ओळख पटली नाही. पोलिसांनी बल्लारशाह इथे अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला असून मृतक इसम लावारिस असल्याने त्याचे ओळख पटविण्याचे आव्हान करण्यात आले.

मृतक इसमाचे वर्णन वय अंदाजे 45,उंची-5,8,रंग-गोरा,शरीर बांधा-सडपातळ, डोक्याचे केस-काळे, चेहरा-लांबट, नाक-सरळ, दात-पूर्ण, मुछ-मोठी(जाडी),दाढी-वाढलेली काळी-पांढरी, डाव्या हातावर “छाया”व “वीरा”असे नाव गोदलेले असपष्ट, ओळख पटविण्याची निशाणी उजव्या हाताचे करंगळी नखा पासून पूर्वी कटलेल्या अवस्थेत,मृतक चा अंगावरील कपडे अंगात फुलबाही चा गुंडाळलेला निळा, पांढरा सिमेंट रंगाचा उभ्या लाईन मध्ये असलेला शर्ट, काळ्या रंगाचा फुल पॅन्ट, काळ्या रंगाचा बेल्ट असे असून मृतक ला कोणी काही एक उपयुक्त माहिती असल्यास रेल्वे पोलीस स्टेशन बल्लारशाह फोन क्र,9823442292 व Hc/214तापसी अंमलदार धनराज वा, नेवारे मो, क्र,7219606449 या क्रमांक वर संपर्क करण्याचे आव्हान बल्लारपूर रेल्वे पोलीस मार्फत करण्यात आले आहे.