कोविड लसीकरण नोंदणी आता आपले सरकार केंद्रातून…

463

नागेश इटेकर

जगात आणि देशात मग ती मोठी शहरे असो वा ग्रामीण भाग असो,कोरोना या महाभयंकर विशाणूने हाहकार माजलेला आहे. अनेक जणांनी जगाचा निरोप घेतला,त्याच बरोबर यात आपल्या सवयी पण लागल्या,मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे,सामाजिक सुरक्षाता, इत्यादि, सगडी कडे लॉकडाऊन मागील वर्षी यात लसीकरण नव्हतं,पण या वर्षी पासून लसीकरण चालू झाले मग ती शहरे असो या गावे असो,ग्रामीण भाग म्हटलं की मग लोकांनकडे मोबाईल नाही,मोबाईल असला की मग तो अँड राईड नाही,मग कसे करणार लसीकरण साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन या साठी कॉमन सर्विस सेंटर (csc) च्या मद्यमातून व आपले सरकार सेवा केंद्र चालक यांचा सहकायाने ग्रामपंचायत मधुन ज्या लोकांकडे मोबाईल नाही,किंवा या बाबत समज कमी अश्या लोकांना आपले सरकार सेवा केंद्र चालक csc आयडी च्या माध्यमातून गाव व ग्रामपंचायत स्तरवर नोंदणी करण्यात येणार आहे.

*लसीकरण महानोंदणी अभियान*
महाराष्ट्रातील सर्व सीएससी केंद्रांवर व ग्रामपंचायत आपले सरकार सेवा केंद्रात कोविड चे लसीकरण कोविन पोर्टल वर नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.

सर्व सीएससी व्हिएलईनी व आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्या परिसरातील सर्व नागरिकांना कोविड च्या लसीकरणासाठी प्रोत्साहन देऊन सर्व नागरिकांची नोंदणी ऑनलाईन करीत आहे.

नोंदणीनंतर लसीच्या उपलब्धतेनुसार जवळील केंद्र , दिनांक व वेळ निवडून नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी.कोविड लस साठी खाली दिलेल्या वेबसाइट वर नोंदणी विनामुल्य करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे १००/ टक्के नोंदणी झाली पाहिजे असे स्थानीक गट विकास अधिकारी शेषराव बुलकुंडे यांनी आव्हान केले आहे.

नोंदणी करण्यासाठी वेबसाईट
https://cowin.csccloud.in/index.jsp