धक्कादायक…! चौकशीचा नावावर विना मास्क विस जणांची उपस्थिती ; ग्रामपंचायत धाबाचा सभागृहात घडला प्रकार

929

गोंडपिपरी: कोरोना हाॕटस्पाट ठरलेल्या धाबा गावात चौकशीचा नावावर विना मास्क महीलांची गर्दी करण्यात आली. विशेष म्हणजे हा प्रकार धाबा ग्रामपंचायतेचा सभागृहात घडला.सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्या सोबतच अंगणवाडी पर्यवेक्षकाही यावेळी उपस्थित होत्या. कोरोना आजाराने धाबा गावातील काहींना जिव गमवावा लागला.टाळेबंदी सूरू असतांना हा प्रकार घडल्याने गावात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील धाबा परिसरात कोरोनाने कहर केला होता.सोमणपल्ली,धाबा कोरोना हाॕटस्पाट ठरले.धाबा गावातील अनेकांना कोरोनाची लागण झाली होती तर काहींना कोरोनामुळे जिव गमवावा लागला.मास्क लावा,सूरक्षित अंतर ठेवा अश्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या.या सूचनांचे पालन सामान्य नागरिकांनी केलेही मात्र ज्या ग्रामपंचायत आणि महीला बाल कल्याण विभागाकडे कोरोना नियंत्रणासाठी महत्वाची भुमिका घेतली होती त्या विभागानेच कोरोना नियमांची पायमल्ली केल्याचा धक्कादायक प्रकार धाबा येथे घडला. येथिल अंगणवाडी क्रमांक चार मध्ये कथित टिएचआर पोषण आहार अपहार प्रकरणाची चौकशी करण्यात आली. ही चौकशी ग्रामपंचायत धाबाचा सभागृहात झाली.सभागृहात सरपंच आणि ग्रामपंचायतेचा सदस्यांची उपस्थिती होती.सोबतच धाबा विभागातील पर्यवेक्षिका,अंगणवाडी सेविकाही उपस्थित होत्या.चौकशीसाठी ग्रामपंचायत परिसरातील महीलांना बोलाविण्यात आले.यावेळी पर्यवेक्षिका ठेमस्कर,सरंपचा घोगरे,ग्रामपंचायत सदस्य गोहणे,अनमुलवार यांनी मास्क लावलेला नव्हता.ज्या महीलांना बोलाविण्यात आले त्या महीलांनीही मास्क लावलेला नव्हता.साधारणता दोन तास चाललेल्या या चौकशीत कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. कोरोना हाॕटस्पाट असल्याने गावातील नागरिक भयभित आहेत.अश्यात ग्रामपंचायतेकडूनच कोरोना नियमांची पायमल्ली झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

विडीओ समोर आल्याने संताप…!

कोरोना नियमावलीची पायमल्ली ठरलेल्या या प्रकाराचा विडीओ,फोटो समोर आले आहे.या विडीओत पदाधिकारी,पर्यवेक्षिका विना मास्क असल्याचे दिसत आहेत.तर उपस्थित अनेक महीलाही विना मास्कच आहेत.

स्तनदा मातांचीही उपस्थित ..!

चौकशीसाठी स्तनदा मातांनाही बोलाविण्यात आले.विना मास्क असलेल्या महीलांचा घोळक्यात ही माता मास्क न लावता बसून होती. कोरोनाचा तिसऱ्या लाटेत बालकांना सर्वाधिक धोका असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.अश्यात स्तनदा मातांला चौकशीचा नावावर विना मास्क असलेल्या घोळक्यात बसविल्याने संताप व्यक्त केला जात आहे.दरम्यान याबाबत पर्यवेक्षिका ठेमस्कर यांना प्रतिक्रिया विचारले असता वरीष्ठांशु बोलून प्रतिक्रिया देणार असे म्हटले तर ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी या विषयावर बोलण्याचे टाळले.