युगपुरुष प्रतिष्ठानच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षरोपण करण्यात आले…

392

निखिल खरात (ठाणे ग्रामीण प्रतिनिधी)

आज दिनांक 5 जून रोजी युगपुरुष प्रतिष्ठान मार्फत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. नेरूळ नवी मुंबई इथे बऱ्याच ठिकाणी वृक्ष रोपण केले. युगपुरुष प्रतिष्ठानच्या वतीने एकूण 80 रोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये औषधी वनस्पती,फळ झाडे आणि फुल झाडे या रोपांचा समावेश होता. वृक्ष रोपणासाठी युगपुरुष प्रतिष्ठानच्या सदस्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती केली.युगपुरुष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजित खताळ व युवा सदस्य अजय रणदिवे, रितेश लगाडे,सोहन तरकसे,रोहित काटे यांच्या नेतत्वाखाली आज चा हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.