कृषी संजीवनी मोहीमअंतर्गत गोंडपीपरी तालुक्यात विविध गावात कृषी विषयक शेत शाळा कार्यक्रमाचे आयोजन…

566

गोंडपीपरी तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम दि. 21 जून ते 1जुलै 2021 पर्यन्त राबविण्यात येत आहे. अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील विविध गावात कृषी संजीवनी मोहीम अंतर्गत शेती विषयक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस यासह इतर बियांनाची बीज प्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात येत आहे. 

प्रथम बुरशीनाशक,नंतर किटकनाशक, नंतर जैविक जिवाणू संवर्धक रायझोबियम, इत्यादी.ची बीज प्रक्रिया करून करण्यात येऊन पेरणी संदर्भात मार्गदर्शन करून विविध खतांच्या मात्रा कश्या द्याव्यात या बद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. निबोळी अर्क, दशपर्णी अर्क,ऍझोला युनिट, याबद्दल मार्गदर्शन करून त्याचा वापरा साठी स्वतः शेतकऱ्यांनी घरीच हे सर्व तयार करावेत असे आवाहन करण्यात येत आहे.

यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोलहाईत साहेब,मंडल कृषी अधिकारी धाबा,टोनगलवार साहेब,कृषी पर्यवेक्षक , कृषी अधिकारी मंगेश पवार साहेब कृषी सहाय्यक पी.पी.पेंदोर यांसह कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांच्या उपस्तीतीथं शेती विषयक कार्यक्रम राबविला जात आहे. गोंडपीपरी तालुक्यातील शेतकऱयांना याचा निश्चितच फायदा होईल असे कृषी विभागाच्या वतीने सॊमवरला सांगण्यात आले.