गडचिरोली शहरातील रस्त्यांचे कामे कधी पूर्ण होतील? नागरिकांना करावा लागतो समस्यांचा सामना…

401

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली:-गडचिरोली शहरात दोन वर्षापासून गटरलाईन चे काम तसेच राष्ट्रीय माहामार्ग चे काम सुरू आहे. शहरातील सर्व चांगले रस्ते फोडून गटरलाईन टाकले परंतु रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे वाहन काढताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे.
सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. सर्व रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडून पाणी साचलेले आहे रस्ते चिखलाने माखलेले आहेत. पायदळ रस्त्याने जाणेही करूच शकत नाही, दुचाकी खूप संभाडून चालवावी लागते. त्या मध्ये घसरुन पडण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे अनेकदा नागरिक जखमी झालेले दिसतात. 

वर्षभरापासुन राष्ट्रीय महामार्ग चे काम इंदिरा गांधी चौक पासून तर शासकीय महाविद्यालय चामोर्शी रोड पर्यंत मार्ग खोदून ठेवल्या मुळे सर्वच वाहनांचा प्रवास एकाच साईड ने होत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहेत.

खोदलेल्या साईड ने पाण्याचे डबके तयार झालेले असल्याने त्यात पडुन लहान मुले तसेच नागरिकांना आपले प्राण गमवायचे फार मोठा धोका निर्माण झालेला आहे. संबंधित कंत्राटदारावर मा.जिल्हाअधिकारी साहेबानी कार्यवाही करून लवकरात लवकर काम पूर्ण झाले पाहिजे असे निर्देश दयावे हि विनंती….