पुलाअभावी नदीतून जीवघेणा प्रवास…

498

एटापल्ली :-पावसाळ्याच्या दिवसात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल कुदरी परिसरातील डझनभर गावांसाठी बांडे नदी काळ बनून उभी असते. पावसाळ्याचे चार महिने या गावांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. नदीवर पूल नसल्याने आदिवासी बांधवांना त्रासदायक ठरतात. स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही या क्षेत्राचा विकास झाला नाही.

एटापल्ली तालुक्यातील काही भाग छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल कुदरी गावाजवळून बांडे नदी वाहते. या नदीवर अनेक वर्षापासून पूल नाही. नदी पार केल्याशिवाय या परिसरातील मवेली, मोहुर्ली, हेलकसा, वेलमागढ, बुर्गी, पिपली, कुंडूम, जवेली, कचरेल, रेगदंडी आदी गावांपर्यंत पोहोचता येत नाही. या भागातील डझनभर रुग्णांना सोसावा लागतो त्रास या भागात अद्यापही आरोग्य सुविधा पोहोचली नाही.

कोणत्याही उपचारासाठी या भागातील नागरिकांना एटापल्ली स्थित ग्रामीण रुग्णालयात जावे लागते. मात्र, पावसाळ्यात चार महिने येथे पोहोचण्यासाठी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांना उपचाराविना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याच संधीचा फायदा घेत या भागात मांत्रिकांचा बोलबाला वाढत आहे.

गावांमध्ये मूलभूत सुविधांचा पत्ता नाही. पाणी, शिक्षण, आरोग्य, वीज आदी सुविधा गावापर्यंत पोहोचल्या नाहीत. अहेरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेला हा क्षेत्र विकासाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र क्षेत्राच्या विकासासाठी ना लोकप्रतिनिधी लक्ष देत ना प्रशासन छत्तीसगड राज्याची सीमा जवळ असल्याने अनेक गावातील नागरिक छत्तीसगड राज्यावरच निर्भर असतात. दैनंदिन साहित्यासाठी या भागातील नागरिक पायीच छत्तीसगड राज्य गाठतात. पुलाअभावी यावर्षीसुद्धा पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांना बांडे नदीतून जीवघेणा लागणार आहे.