वाघाच्या हल्ल्यात बैल जागीच ठार; कोठारी येथील घटना…

656

सुनील बोनगीरवार (बल्लारपूर तालुका प्रतिनिधी)

कोठारी: बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलिस ठाण्याच्या अगदी मागे शेतीशिवार लागलेला आहे. सध्या सर्वत्र शेतीचे काम सुरू असून शेतीचे कामे आटपून परत येताना वाघाच्या हल्ल्यात बैल ठार झाल्याची घटना घडली.

सविस्तर असे की, शेतकरी संजय गुरू यांनी काल सायंकाळी आपल्या शेतातून बैल घेऊन घराकडे परत येत असताना अंधार झाला. त्या मार्गावर दगा धरून बसलेल्या वाघाने अचानक बैलावर हल्ला करून जागीच ठार केले. या बैलाची अंदाजे किंमत 60000/- रुपये इतकी होती.

सध्या शेतीचा हंगाम चालू असताना बैल ठार झाल्याने शेतकर्‍यांच्या हात मोडल्या सारखा झाला असून वनरक्षक श्री टेकाम पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.