गोंडपिपरी तालुक्यात वैध देशी दारुची अवैधरित्या नदीपात्रातून वाहतूक…पोलीस विभागाची भूमिका संशयास्पद…

826

-शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी

चंद्रपूर: जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात आली. देशी भट्या बार सुरू झाल्या. दाम दुपट देऊन विकत घ्यावी लागणारी दारू आता स्वस्त दरात मिळत असल्याने तळीरामात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. अश्यातच कोरोनामुळे दारू विक्रीची दुकाने सोमवार ते शुक्रवार चार वाजेपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे निर्देश देण्यात आले. मात्र सुट्टीच्या दिवसातही मागील दाराआड मद्य विक्री सुरूच असल्याचे निदर्शनास येत आहे.

तालुक्यात काही भट्टी मालक राजरोसपणे वैध देशी दारू अवैध रित्या माणसे लावून कधी दुचाकी तर कधी रात्रोच्या सुमारास चारचाकी वाहनाने नंदवर्धन दरूर अडेगांव मार्गे नदीपात्रातुन थेट परराज्यात वैध दारूची अवैध दारू तस्करी सुरूच आहे. मात्र पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे.

शनिवार व रविवार ला देशी विदेशी दारू ची दुकानात मागील दारातून तळीरामाना सहज दारू मिळत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने याकडे जातीने लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.