शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटल्याने चालकाचा जागीच मृत्यु; गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द येथील घटना…

1765

-शरद कुकूडकार प्रतिनिधी भंगाराम तळोधी
गोंडपीपरी: तालुक्यातील तारसा खुर्द येथे प्रभू सदन चर्च असलेल्या शेत शिवारात रोवण्याचे काम सुरू आहे. त्या कामावर चंदनखेडी येथील प्रमोद गेडाम वय अंदाजे 36 वर्ष हा व्यक्ती आपल्या कुटूंबासह सालगडी राहून काम करीत होता. प्रभू सदन तारसा येथील कामकाज पाहणाऱ्या फादरच्या देखरेखेखाली तो काम करीत होता.

प्रभू सदनच्याच मालकीचा असलेल्या ट्रॅक्टर वर ट्रक्टर चालक म्हणून तो कार्यरत होता. अश्यातच काल दि. १९ जुलै रोज सोमवारला शेतशिवारात रोवणीचे काम सुरू असताना शेतात चिखल करताना ट्रॅकर बांधीत फसली. बली लावून ट्रक्टर बांधीतून काढण्यात आली. आणि दुसऱ्या बांधीत ट्रॅक्टर नेत असताना लावलेली बली काढण्याचे विसरून गेल्याने ट्रक्टर ला लावलेली बल्ली तिथेच अडकून राहल्याने ट्रक्टर पलटून सदर अपघात घडला.

या अपघातात चालकाच्या अंगावर ट्रॅक्टर पलटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. त्याच्या पश्चात 2 मुली व एक मुलगा असा आप्त परिवार असून त्याच्या अचानक जाण्याने कुटूंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. मृतकाचे शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले असून पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.