बल्लारपुरात तलवारीने दहशत पसरविण्याचा प्रयत्न…गॅंगवार मध्ये 1 गंभीर जखमी असल्याचे वृत्त…

1168

बल्लारपूर- : एकेकाळी बल्लारपूर शहर अमन व शांतीचा संदेश देणारे शहर म्हणून ओळखले जायचे मात्र सद्यस्थिती बल्लारपूर शहरात भाईगिरी चे प्रस्थ वाढत चालले की काय ? असे चित्र निर्माण होतांना दिसत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार बल्लारपूर शहरातील महाराणा प्रताप वॉर्डातील परिसरात आपसी वादातून तलवारी निघाल्याचे वृत्त आहे सविस्तर माहितीनुसार गुरुवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास सदर घटना घडली असल्याचे वृत्त आहे.

या घटनेत बोग्गा रा.बीटीएस प्लॉट परिसर नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत तत्पूर्वी या परिसरात दहशत पसरविण्यासाठी काही चार चाकी गाड्यांचे नुकसान करण्यात आले.

या तलवार बाजीच्या घटनेमुळे या परिसरात दहशतीचे वातावरण असून पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचे वृत्त असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहे. साडे नऊ चा सुमारास महाराणा प्रताप वार्ड येथील सुभाष चौक येथे गॅंग वार मध्ये एका ला तलवारीने वार करून गंभीर जखमी केले.

खूप दिवसा पासून दोन्ही गॅंग मध्ये पुरानी दुश्मनी मध्ये झगडे भांडण चालूच होते दोन्ही गॅंग हातात तलवार घेऊन एकमेकांवर हल्ला करण्या करिता तयारच राहत होते दि , 23 रोजी सुद्धा सायंकाळी चा सुमारास हातात तलवार घेऊन दहशत निर्माण करीत होते. साय साडे नऊ चा सुमारास एका व्यक्ती ला पकडून तलवारीने व लाठी ने वार करून गंभीर जखमी केले. माहिती मिळताच वेळेवरच पोलीस दाखल होऊन जखमींला दवाखान्यात नेण्यात आले. घटनास्थळी पोलीसदाखल होऊन आरोपीचा शोध घेत आहेत.