विजय तोकला,इंडिया दस्तक सिरोंचा तालुका प्रतिनिधी
सिरोंचा:- जिल्ह्यात व तालुक्यात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात प्राणहिता व गोदावरी नदीला अचानक पूर आल्याने भोई-ढीवर समाज बंधावांचे अतोनात नुकसान जाडे-डोंगे वाहून गेल्याचे छित्र दिसत आहे.
माहे-जुलै 2021 महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राणहिता व गोदावरी नदीनं अतिपूर आल्यामुळे वाल्मीकी मत्स्यव्यवसाय सह. संस्थेचे मासेमारी करणारे काही उल्लेखित सभासदानी पुरामध्ये जाडे-डोंगे व इतर साहित्य वाहून जाऊन आर्थिक नुकसान झाल्याचे संस्थेला कळविले.वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सह.संस्थेच्या माध्यमातून सभासदांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.निवेदनात असे म्हंटले आहे की,अतिवृष्टीमुळे झालेल्या सभासदांची पटवारी,ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील यांची मोका पंचनामे अहवाल तयार करून शासनाकडे मासेमारी करणारे भोई-ढीवर समाज बांधवांना नुकसान भरपाई (आर्थिक मदत) मिळतील असं निवेदन सादर केले आहे.
यावेळी वाल्मिकी मत्स्यव्यवसाय सह.संस्थेचे अध्यक्ष श्री मदनय्या मादेशी,रामू सुव्वा,तुमनुरी पेद्दजक्कलु,रमेश सुव्वा,मधुकर गंगनबोईना,तुमनुरी नागेश, पानेम मधुकर, तुमनुरी दुर्गेश, आदी होते.