भीम आर्मीकडे युवकांचा वाढत आहे कल…कोठारीमध्ये भीम आर्मी ची शाखा गठीत..

1043

सुनील बोनगीरवार (बल्लारपूर तालुका प्रतिनिधी)

गाव तिथे शाखा संकल्पने अंतर्गत भीम आर्मी चे बल्लारपूर शहर प्रमुख अमरभाऊ धोंगडे यांच्या नेतृत्वात व जिल्हा प्रमुख जितेंद्रभाऊ डोहणे, जिल्हा महासचिव सुरेंद्रभाऊ रायपुरे यांच्या नेतृत्वात कोठारी या गावातील भीम आर्मी ची शाखा आज दिनांक 01/08/2021 रोजी गठीत झाली.
भीम आर्मी ची संकल्पना, उद्दिष्टे व कार्यप्रणाली बद्दल जिल्हा प्रवक्ता अमोल भाऊ खोब्रागडे यांनी प्रास्ताविक मांडली तर जिल्हा महासचिव सुरेंद्र भाऊ रायपुरे यांनी संघटनेचे महत्व व संघटनेची ताकत बाबतीत भूमिका मांडली, महानगर प्रमुख प्रशांत भाऊ रामटेके यांनी शासनाची कुटनीती व बहुजन समाजातील युवकांची होणारी कोंबी याबद्दल माहिती दिली तर जिल्हा प्रमुख यांनी अधक्षीय भाषणात भीम आमी च्या नावाचा कसा धसका बसतो व शासन भीम आर्मीच्या नावाणे कसा घाबरतो आणि त्यामुळे भीम आर्मी आजच्या काळाची कशी गरज आहे ते पटवून दिले.
त्यात सर्वानुमते शाखा प्रमुख म्हणून प्रमोद कातकर, महासचिव केतन वासनिक, उपाध्यक्ष युगुल तोडे, राहुल रामटेके, पंकज मावलीकर, संघटक स्वप्नील देठे, सचिव आकाश कांबळे, कोषध्यक्ष प्रफुल साखरकर, प्रवक्ता सचिन रायपूरे यांची नियुक्ती करण्यात आली.
या कार्यक्रमात प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा प्रमुख जितेंद्र भाऊ डोहणे, जिल्हा महासचिव सुरेंद्र भाऊ रायपुरे,चंद्रपूर जिल्हा प्रवक्ता अमोलभाऊ खोब्रागडे, चंद्रपूर महानगर प्रमुख प्रशांत भाऊ रामटेके, बल्लारपूर तालुखा प्रमुख अमन सोमकुवर, बल्लारपूर शहर प्रमुख अमन भाऊ धोंगडे,अमिश भाऊ मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते