अवैद्य सावकारीवर आळा घालण्याची राजू झोडे यांची मागणी…

454

बल्लारपूर:- बल्लारपुरात वाढत्या गुंड प्रवृत्तीच्या अवैद्य सावकाराच्या दहशतीने शहरवासीयात भीतीचे वातावरण तयार झाले असुन त्यातच एका अॉटोचालकाने अवैद्य सावकाराच्या सततच्या त्रासाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
शहरात अवैध सावकारांने अघोषीत आपली सत्ता गुंडांच्या भरवशावर सुरु केली असून या सावकाराच्या दहशतीने आजपर्यत कुणीही तक्रार देत नसल्याने यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढतच आहे.

बल्लारपूरात एक नूकतीच घटना घडली असून दिनांक ३१-७-२०२१ ला बालू झाडे नामक अँटोचालकाने अवैध सावकाराकडुन ५०००₹ कर्ज ४० टक्के व्याजाने घेतले होते.परंतु लॉकडाऊन मुळे धंदा डबघाईस आल्याने पैसे परत करण्यास उशीर झाल्याने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सोबत घेऊन अवैध सावकाराने त्याला मारहाण केली व एका दीवसात पैशै परत न केल्यास अँटो हिसकाऊन नेईल अशी धमकी दिल्याची चर्चा परिसरात आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बालू झाडे यानी स्वता:च्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजते.

सावकाराच्या गुंडशाहीमुळे कूणीच तक्रार करण्यास समोर येत नाही.सदरची घटना घडल्याने मृतकाच्या घरी भीतीचे वातावरण पसरले असून तक्रार केल्यास आमच्याही जीवास धोका निर्माण होऊ शकतो या भीतीने तक्रार करण्यास मागेपुढे बघत आहेत.
पोलीस प्रशासनाने स्वता: याची दखल घेऊन अवैध सावकारावंर कार्यवाही करावी व मृतकाच्या
परीवारास न्याय द्यावा अशी मागणी राजु झोडे व बल्लारपूर शहरवासीयानी केली आहे.

जर अवैद्य गुंड प्रवृत्तीचे सावकार सर्वसामान्य जनतेच्या गरिबीचा फायदा घेऊन लूटमार करत असतील तर याची माहिती मला द्यावी मी त्यांना सरळ करणार असे आवाहनही राजू झोडे यांनी जनतेला केले.