भंगाराम तळोधीच्या अनिकेत दुर्गे चे थेट अमेरिकेतून कौतुक…

2409

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) भंगाराम तळोधी येथील अनिकेत दुर्गे याचा यिनच्या नाशिक अधिवेशनात ठराव मांडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.हा व्हिडीओ अमेरिकेत राहणाऱ्या डॉ संगीता तोडमल यांनी बघितला आणि अनिकेतच्या कार्याचे कौतुक केले.

दैनिक सकाळ मीडिया ग्रुपने स्थापन केलेल्या यिन या संघटनेचा अनिकेत दुर्गे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष आहे.यिनचे अधिवेशन नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले.
सदर अधिवेशनात अनिकेतने आपल्या उत्कृष्ट वक्तृत्व शैलीत खनिज कर्म बाबत ठराव मांडला.आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ठराव मांडतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला.हा व्हिडीओ बघून अमेरिकेतील केन्टकी राज्यातील पर्यावरणाचा अभ्यास करणाऱ्या डॉ संगीता तोडमल यांनी मेसेज द्वारे अनिकेतचे कौतुक केले.

‘महाराष्ट्राच्या कोपऱ्यात वसलेल्या माझ्यासारख्या मुलाचे कौतुक थेट अमेरिकेतून होते ,माझ्यासाठी ते खूपच प्रेरणादायी आहे ‘अशी प्रतिक्रिया अनिकेतने व्यक्त केली आहे.

अनिकेतचे व्यक्तिमत्व चौफेर आहे.समाजकार्य शाखेचा तो विद्यार्थी आहे .उत्कृष्ट वक्तृत्व शैली विकसित केलेला अनिकेत सामाजिक कार्यकर्ताही आहे.विविध उपक्रम राबवतो.लाकडावून काळात आपल्या गावात त्याने गोरगरिबांच्या मुलांची शाळा भरवली.गरजूंच्या मदतीसाठी तो तत्पर असतो.

तो कलाकार /नकलाकारही आहे !
संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनिकेतने संदीप काळे सर ,शाम सर ,कृष्णा शर्मा सर ,सकाळचे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे सर ,तालुका प्रतिनिधी संदीप रायपुरे ,श्रीकांत पेशट्टीवार यांचे आभार मानले आहेत.