पतंजली परिवार, आरमोरी तर्फे जडीबुट्टी दिन साजरा..

456

– गौरव लुटे
(आरमोरी तालुका प्रतिनिधी ) -आचार्य बालकृष्णजी यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने दरवर्षी 4 ऑगस्टला साजरा होणारा ‘जडीबुट्टी दिन’ यावर्षी पतंजली योग परिवार, आरमोरी तर्फे उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पतंजली योग परिवार, आरमोरीच्या सर्व योगयोध्यांनी डॉ. राम राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयुर्वेदिक आणि जडीबुट्टी शोध यात्रा आयोजित केली. यानिमित्त पोर्ला येथील गडचिरोली हर्बल क्लसस्टार प्रोड्युसर कंपनी लिमिटेड च्या संचालिका सौ. मनीषा सज्जनपवार यांनी औषधीयुक्त रानभाज्या तसेच संतोष बेझंकीवार यांनी प्रकल्पाविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री.सत्यनारायण चाकिनारपवार, शरद डोके, राजू मुरमूरवार हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे संचालन सौ. ज्योती खेवले तर आभारप्रदर्शन सौ. राजश्री राऊत यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पतंजली योग परिवार, आरमोरीच्या सर्व योग-शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.