कोरोनाच्या काळात केंद्राचा भाजप विरहीत राज्यांना दुजाभाव- खा. बाळू धानोरकर..

281

चंद्रपूर : कोरोनाचे जागतिक वैश्विक संकट आले होते. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्य़ा होती. भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्यांनी मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या कमी दाखविली तसेच केंद्र सरकारने दिलेले 5 लीटरचे ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर ही शोभेची वस्तू ठरली असून, केंद्राने कोरोना काळात भाजप विरहित राज्यांसोबत दुजाभाव केला असा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी AICC संशोधन विभागाद्वारे COVID-19 हेल्थ इन इंडीया या विषयाच्या चर्चा सत्रात केला.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात देशात केंद्र सरकारच्या नियोजनाच्या अभाव असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे या गंभीर संकटात अनेक राज्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर मिळाले नाही. त्यासोबतच या काळात केंद्र सरकारचे लक्ष फक्त निवळणुकीत असल्याचे दिसून आले होते. या काळात कोरोनावर मत करण्याकडे लक्ष न देता मध्य प्रदेश येथील काँग्रेसची सत्ता त्यांना पढायची होती. त्यासोबतच या काळात पश्चिम बंगाल या राज्यात देखील निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे या काळात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यासोबतच भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात दिवसाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची सख्य्या होती. या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील आकडे मोठया प्रमाणात मृत्यू पावले असल्याचे आहे. या दोन्ही आकड्यात फरक असल्याचे दिसून येत आहे. तरी देखील या राज्यात मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारचा आशीर्वाद असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप खासदार बाळू धानोरकर यांनी केला.